Pune News : रांका ज्वेलर्सकडून मंगळसूत्र, बांगड्या आणि ब्रेसलेट्सच्या घडणावळीवर खास सवलत
Pune News : सुवर्ण अलंकारांच्या क्षेत्रात १४७ वर्षांची समृद्ध सोनेरी परंपरा जपणाऱ्या नामांकित 'रांका ज्वेलर्स'ने आपल्या ग्राहकांसाठी श्रावण व आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एक आकर्षक ऑफर जाहीर केली आहे.

Pune News : सुवर्ण अलंकारांच्या क्षेत्रात १४७ वर्षांची सोनेरी परंपरा जपणाऱ्या रांका ज्वेलर्स यांनी ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत रांका ज्वेलर्सच्या शोरूम मध्ये मंगळसूत्र, बांगड्या आणि ब्रेसलेट्स कलेक्शनच्या घडणावळीवर सरसकट फक्त ८ टक्के मजुरी आकारली जाणार आहे. (Pune News)
भारतीय संस्कृतीत मंगळसूत्र हे केवळ दागिना नसून प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराच्या सहजीवनाचे प्रतीक मानले जाते. तसेच बांगड्या आणि ब्रेसलेट्स हे व्यक्तिमत्त्वाला अधिक आकर्षक बनवणारे आणि प्रत्येक क्षणाला खास बनवणारे अलंकार आहेत. (Pune News)
या भावनेला जपत रांका ज्वेलर्सने ग्राहकांसाठी ही विशेष सवलत उपलब्ध करून दिली आहे. रांका ज्वेलर्समध्ये पारंपरिक आणि आधुनिक डिझाइन्सचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. ग्राहकांना ५,००० हून अधिक आकर्षक डिझाइन्समधून आपल्या आवडीनुसार दागिने निवडण्याची संधी मिळणार आहे. (Pune News)
ही विशेष ऑफर ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत रांका ज्वेलर्सच्या रविवार पेठ, लक्ष्मी रोड, कर्वे रोड, पिंपरी चिंचवड, हडपसर, सिंहगड रोड, सातारा रोड, बंडगार्डन, बाणेर, पिंपळे सौदागर (रहाटणी), कोंढवा, खराडी, वाघोली, चाकण, भोसरी आळंदी रोड, ठाणे व छत्रपती संभाजीनगर या शाखांमध्ये उपलब्ध असून, या संधीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी जवळच्या रांका ज्वेलर्स शोरूमला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Pune News)
Omprakash Ranka Passes Away: पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती ओमप्रकाश रांका यांचे निधन





