Pune News : पुणे-दौंड मार्गावर मोठा रेल्वे अपघात टळला; ओव्हरहेड वायर तुटल्याने ५ प्रमुख गाड्यांचा खोळंबा
Pune News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील हडपसर ते लोणी दरम्यान एक मोठा रेल्वे अपघात टळला आहे.

Pune News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील हडपसर ते लोणी दरम्यान एक मोठा रेल्वे अपघात टळला आहे. पनवेलहून नांदेडकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक १७६१३ (पनवेल-नांदेड एक्सप्रेस) समोर अचानक गुरं आल्याने हा अपघात झाला. (Pune News)
इंजिनला गुरांचा जोरदार फटका बसल्यामुळे रेल्वेची ओव्हरहेड वायर (OHE) तुटली. वीज पुरवठा खंडित झाल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. (Pune News)
या ओव्हरहेड वायर बिघाडामुळे पुणे विभागातून जाणाऱ्या पाच महत्त्वाच्या गाड्यांवर थेट परिणाम झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने बिकानेर – यशवंतपूर एक्सप्रेस, पुणे – दौंड डेम्यू लोकल, एकतानगर – चेन्नई एक्सप्रेस, पुणे – सोलापूर एक्सप्रेस आणि राजकोट – सिकंदराबाद एक्सप्रेस या गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. (Pune News)
या तांत्रिक बिघाडामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून, युद्धपातळीवर ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. वाहतूक लवकरच पूर्ववत होईल, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दिली. (Pune News)





