Ranka Hospital : रांका हॉस्पिटलतर्फे 25 वर्षांच्या विश्वासपूर्ण सेवेनिमित्त विशेष ऑर्थोपेडिक केअर कॅम्प
25 वर्षांपासून रुग्णसेवेत समर्पित असलेल्या रांका हॉस्पिटलतर्फे (Ranka Hospital) समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ३ ते ७ ऑगस्ट दरम्यान विशेष ऑर्थोपेडिक केअर कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.

Ranka Hospital : 25 वर्षांपासून रुग्णसेवेत समर्पित असलेल्या रांका हॉस्पिटलतर्फे (Ranka Hospital) समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ३ ते ७ ऑगस्ट दरम्यान विशेष ऑर्थोपेडिक केअर कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
या विशेष उपक्रमांतर्गत गुडघेदुखी, पाठदुखी, संधिवात, क्रीडाजन्य दुखापती, मानदुखी, खांदेदुखी तसेच सांध्यांच्या विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना तज्ज्ञांकडून सल्ला व उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या कॅम्पमध्ये (Ranka Hospital) डॉ. रमेश रांका (मुख्य ऑर्थोपेडिक सर्जन) आणि डॉ. विनायक गरजे (ऑर्थोपेडिक सर्जन) यांच्याकडून रुग्णांची तपासणी व उपचार मार्गदर्शन करण्यात येईल.
कॅम्पमधील विशेष सुविधा
तज्ज्ञ ऑर्थोपेडिक सल्ला
फिजिओथेरपी मूल्यांकन व पुनर्वसन
प्रमाणित फिजिओथेरपिस्टकडून व्यायामाचे मार्गदर्शन
सर्व तपासण्यांवर ५०% सूट
सर्व औषधांवर १०% सूट
यावेळी डॉ. रमेश रांका म्हणाले, “गेल्या २५ वर्षांपासून रांका हॉस्पिटलने दर्जेदार, नैतिक आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. समाजाने आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष ऑर्थोपेडिक केअर कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. अधिकाधिक नागरिकांना तज्ज्ञ ऑर्थोपेडिक सेवा सुलभ व परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.” हा विशेष ऑर्थोपेडिक केअर कॅम्प ३ ते ७ ऑगस्ट दरम्यान रांका हॉस्पिटल, मुकुंद नगर, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क करा:
०२०-२४२६१६०० | ७३८७६ ०१४९५
रांका हॉस्पिटल
SAFE HANDS. EXPERIENCED MINDS.






