Baramati News : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा स्तुत्य उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर व पदसेवेचे आयोजन!
संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत आरोग्य शिबिर (Baramati News) व पदसेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Baramati News : संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत आरोग्य शिबिर (Baramati News) व पदसेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
समाजसेवा आणि वारकरी सेवेचा वसा जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष वैभव सोलनकर (Baramati News) यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हजारो वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, तसेच त्यांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये वारकऱ्यांची (Baramati News) मोफत आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार, आवश्यक औषधांचे वाटप तसेच वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर पदसेवा उपक्रमांतर्गत वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, आवश्यक मदत व विविध सेवा देण्यासाठी युवा मोर्चाचे कार्यकर्ते दिवसभर सेवेत कार्यरत होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक म्हणाले, “वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलाची सेवा आहे. संतांची परंपरा ही समाजसेवा, समर्पण आणि संस्कार शिकवणारी आहे. त्याच विचारातून भाजप युवा मोर्चा केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत अशा सेवाभावी उपक्रमांचे सातत्याने आयोजन करत आहे.”
युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी सांगितले, संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्याला लाखो भाविक सहभागी होतात. या वारकऱ्यांच्या सेवेत योगदान देण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी भाग्याचे आहे. युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत असून, समाजहिताचे असे उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात राबविले जातील.”*
या सेवाभावी उपक्रमाचे वारकरी, स्थानिक नागरिक आणि उपस्थितांनी मनापासून स्वागत केले. सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांच्या सेवेसाठी भाजप युवा मोर्चाने केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक, जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर, जिल्हा सरचिटणीस स्वप्नील मोडक, ओमकार कडे, विवेक साळुंके, बारामती शहराध्यक्ष अभिषेक चिंचकर, तालुकाध्यक्ष जगदीश कोळेकर, संदीप केसकर, मयूर शिंदे, ऋग्वेद सातपुते, हर्षद जगदाळे, सोहेल शेख तसेच भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वैद्यकीय पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






