Suryakumar Yadav Dropped : खेळण्याची तयारी दाखवूनही सूर्याला थेट डच्चू! टीम इंडियानंतर मुंबई संघातूनही वगळलं; समोर आलं कारण
Suryakumar Yadav Dropped : सूर्यकुमार यादवला मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघात स्थान देण्यात आलेले नाही.

Suryakumar Yadav Dropped From Mumbai Ranji Trophy Squad Training Camp Reason : आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामाच्या पहिल्या सामन्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. मात्र, या संघातून भारताचा स्टार टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) नाव अचानक गायब असल्याने क्रीडावर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सूर्याने स्वतः या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचे कळवले असतानाही निवड समितीने त्याला थेट डावलले. आता एमसीएच्या एका वरिष्ठ सूत्राने पीटीआयशी बोलताना सूर्याला संघातून बाहेर ठेवण्यामागचे मुख्य कारण उघड केले आहे.
महिन्याभराच्या सराव शिबिराकडे पाठ; लाल चेंडूच्या क्रिकेटपासून दूर!
एमसीएच्या सूत्रांनुसार, मुंबईचा संघ गेल्या महिन्याभरापासून लाल चेंडूने (रेड बॉल) कसून सराव करत आहे. मात्र, सूर्यकुमारने या शिबिराकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती. तो बऱ्याच काळापासून लाल चेंडूच्या क्रिकेटपासून लांब राहिला असून त्याने अलीकडच्या काळात एकही मोठा चार दिवसीय सामना खेळलेला नाही. शिबिराला गैरहजर राहणे हीच त्याला बाहेर बसवण्यामागचे सर्वात मोठे कारण ठरले आहे.
१० दिवस आधी संपर्क साधला, पण प्रतिसाद नाही; तरुणांना प्राधान्य!
निवड समितीने सुमारे १० दिवसांपूर्वी जेव्हा सूर्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. नंतर त्याने स्वतः उपलब्ध असल्याचे सांगितले; मात्र महिन्याभरापासून मैदानावर घाम गाळणाऱ्या युवा खेळाडूंना डावलून थेट सूर्याला संघात घेणे अन्यायकारक ठरेल, असा रोखठोक पवित्रा निवड समितीने घेतला. म्हणूनच ११ ते १४ ऑक्टोबर दरम्यान चंदीगडविरुद्ध होणाऱ्या सलामीच्या लढतीत त्याला स्थान दिले गेले नाही.
वापसीसाठी स्थानिक क्रिकेटची अट; सिद्धेश लाडकडे कर्णधारपद!
MCA chief selector Rajesh Pawar explains Suryakumar Yadav’s omission from Mumbai’s squad.
“He is obviously a big-match player and a proven performer for Mumbai. We just want him to get into rhythm by playing a few red-ball matches.”
(Source: PTI)
#SuryakumarYadav https://t.co/An07aHXeyu
— OneCricket (@OneCricketApp) October 6, 2026
सूर्यासाठी मुंबई संघाचे दरवाजे कायमचे बंद झालेले नाहीत. त्याला पुन्हा रणजी संघात स्थान मिळवायचे असेल, तर पोलीस शिल्ड किंवा पुरुषोत्तम शिल्ड यांसारख्या स्थानिक स्पर्धांमध्ये खेळून स्वतःचा फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करावा लागेल.
शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे महिनाभर बाहेर; सिद्धेश लाडकडे धुरा!
Mumbai Senior Men’s Selection committee chairman confirmed they will go for young talents for the start of the season.
He says, Suryakumar Yadav is a big match player and proven performer but as of now, he hasn’t played red ball cricket in the last 18 months so they want him to have some game under belt before coming into Mumbai team.
— Johns. (@CricCrazyJohns) October 5, 2026
मुंबई संघाला आणखी एक मोठा धक्का बसला असून अष्टपैलू शार्दूल ठाकूर सराव करताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे किमान एक महिन्यासाठी बाहेर फेकला गेला आहे. पहिल्या सामन्यासाठी सिद्धेश लाडची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित मोसमातही तोच नेतृत्व करू शकतो. या संघात यशस्वी जैस्वाल आणि सर्फराझ खानसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.





