MNS News : राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
पुण्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS News) प्रचंड मोठा हादरा बसला आहे.

MNS News : पुण्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS News) प्रचंड मोठा हादरा बसला आहे. मनसेच्या स्थापनेपासून पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या आणि पक्षाचा मुख्य चेहरा मानल्या जाणाऱ्या रणजीत शिरोळे यांनी अखेर राज ठाकरे यांची साथ सोडत काँग्रेसचा हात हाती धरला आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात घडलेल्या या राजकीय भूकंपामुळे मनसेच्या (MNS News) गोटात मोठी खळबळ उडाली आहे.रणजीत शिरोळे यांनी मनसेमध्ये दीर्घकाळ राज्य सरचिटणीस या अत्यंत महत्त्वाच्या पदावर काम केले होते. पुण्यात मनसेची पाळेमुळे घट्ट करण्यात आणि संघटनात्मक बांधणीत त्यांचा मोठा वाटा होता.
इतकेच नव्हे तर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मनसेचे (MNS News) अधिकृत उमेदवार म्हणून पुणे मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. पक्षाच्या पडत्या आणि चांगल्या अशा दोन्ही काळात ठामपणे उभे राहणारे शिरोळे आता थेट काँग्रेसवासी झाल्यामुळे पुण्यात मनसेला मोठा राजकीय फटका बसल्याचे स्पष्ट दिसत आहे.






