Ranjangaon News : निवडणुकीपूर्वी भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’! पाचुंदकर दाम्पत्य समर्थकांसह भाजपमध्ये दाखल

प्रभात वृत्तसेवा
रांजणगाव गणपती – पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर पाटील आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व रांजणगाव गणपती देवस्थानच्या अध्यक्ष स्वाती पाचुंदकर पाटील यांनी आपल्या समर्थकांसह नुकताच मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेखर पाचुंदकर व स्वाती पाचुंदकर यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
त्यांच्यासोबत उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य दादामामा शेळके, सतीश शेळके, नामदेवराव पाचुंदकर यांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) गणेश ताठे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप कंद, दौंड विधानसभा सदस्य राहुल कुल, मंडल अध्यक्ष राहुल पाचर्णे, संयोगिता पलांडे, सरचिटणीस श्रीकृष्ण देशमुख, नानासाहेब लांडे, अमोल बोह्राडे, हर्षल जाधव आदी उपस्थित होते.





