Ranjangaon Crime | मोटारसायकल काढण्यावरून पाच जणांनी तरुणावर केला जीवघेणा हल्ला ; युवक गंभीर जखमी

प्रभात वृत्तसेवा
रांजणगाव गणपती – येथे किरकोळ कारणावरून तरुणावर पाच जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी विशाल बाळासाहेब कुटे (वय ३१, रा. मोडकाई वस्ती, रांजणगाव गणपती) यांच्यावर ११ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सोनेसांगवी रस्त्यालगत महागणपती वाहनतळाजवळ रितेश संजय पाचुंदकर व त्याच्या ४-५ साथीदारांनी हल्ला केला.
वाहनतळावरून मोटारसायकल काढण्याच्या कारणावरून आरोपींनी हातातील कडे, लाकडी काठी व स्टूलने फिर्यादीच्या डोक्यात व पाठीवर आघात केले. या मारहाणीमध्ये फिर्यादीला गंभीर दुखापती झाल्या.फिर्यादीच्या तक्रारीवरून रितेश संजय पाचुंदकर व त्याचे पाच अनोळखी साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार गुलाबराव येळे करत आहेत.



