Ramesh Tikhe Death : शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांकडून पोलिसांवर गंभीर आरोप
Ramesh Tikhe Death : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी रमेश तिखे (Ramesh Tikhe Death) यांचा हृदयविकाराने निधन झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली

Ramesh Tikhe Death : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी रमेश तिखे (Ramesh Tikhe Death) यांचा हृदयविकाराने निधन झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात बेपत्ता नगरसेवकांच्या पोस्टर्स लावण्याच्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून वारंवार फोन आणि चौकशीसाठी बोलावल्याने त्यांची तब्येत खालावली (Ramesh Tikhe Death) आणि अखेर आज पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
पोलिसांच्या मानसिक दबावाचा आरोप
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे की, कोळसेवाडी पोलिसांनी टाकलेल्या सततच्या दबावामुळे आणि मानसिक तणावामुळे रमेश तिखे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. बेपत्ता नगरसेवकांच्या फोटो लावण्याच्या कार्यक्रमात रमेश तिखे उपस्थित होते. या प्रकरणात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस ठाण्यात वारंवार बोलावले जात होते. यामुळे ते तणावाखाली होते आणि त्यामुळे त्याची तब्येत बिघडली, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोघे बेपत्ता असल्याची तक्रार ठाकरे गटाने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. पोलिस तपास करत असताना ठाकरे गटाने स्वत:हून या बेपत्ता नगरसेवकांच्या फोटोंसह पोस्टर्स शहरात लावले. या पोस्टरबाजीबाबत मधुर म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना, विशेषत: रमेश तिखे यांना चौकशीसाठी वारंवार बोलावले आणि फोन करून दबाव टाकला, असा दावा करण्यात आला आहे.
पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संताप आणि शोककळा
या घटनेने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या कारवाईला जबाबदार धरून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. कल्याण पूर्वेत राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनीही पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. रमेश तिखे हे पक्षात सक्रिय आणि आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
पोलिसांची भूमिका
पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. प्रकरणाची चौकशी पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. रमेश तिखे यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतरच अधिकृत माहिती उपलब्ध होईल, असे पोलिसांनी सांगितले.
हे पण वाचा : बीसीसीआयला ‘श्रीमंत’ करणारा किमयागार हरपला! त्यांनी घेतलेले ‘हे’ ४ मोठे निर्णय माहीत आहेत का?
Girish Mahajan : महिला कर्मचाऱ्याच्या संतापानंतर मंत्री गिरीश महाजनांची दिलगिरी; काय म्हणाले पहा..






