Badrinath-Kedarnath : बद्रीनाथ–केदारनाथसह ‘या’ ४८ पवित्र स्थळांवर गैर-हिंदूंना प्रवेश बंद? मंदीर समिती घेणार मोठा निर्णय….

Badrinath-Kedarnath : चार धाम तीर्थक्षेत्रांवर गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या दिशेनेबद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Updated On:
Badrinath-Kedarnath : बद्रीनाथ–केदारनाथसह ‘या’ ४८ पवित्र स्थळांवर गैर-हिंदूंना प्रवेश बंद? मंदीर समिती घेणार मोठा निर्णय….

Badrinath | Kedarnath | Non Hindus Temple Ban : देवभूमी उत्तराखंडमधील चार धाम तीर्थक्षेत्रांवर गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या दिशेनेबद्रीनाथ–केदारनाथ मंदिर समितीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी स्पष्ट केले की, बद्रीनाथ (Badrinath) आणि केदारनाथसारखी तीर्थस्थाने ही पर्यटनस्थळे नसून सनातन धर्माची सर्वोच्च आध्यात्मिक केंद्रे आहेत. त्यामुळे येथे प्रवेश हा नागरी हक्क म्हणून नव्हे, तर धार्मिक परंपरा आणि श्रद्धेच्या चौकटीत पाहिला पाहिजे.

हेमंत द्विवेदी म्हणाले, “चार धाम ही श्रद्धा, साधना आणि तपस्येची स्थाने आहेत. अनेक धर्मगुरू आणि संतांनी सातत्याने सांगितले आहे की या पवित्र तीर्थस्थळांमध्ये गैर-हिंदूंनी प्रवेश करू नये. आम्ही सनातन परंपरेचा आदर राखून हा निर्णय घेण्याचा विचार करत आहोत.” असं देखील सांगण्यात आलं आहे.

kedarnath

राज्य सरकारचा सकारात्मक संकेत :

दरम्यान, या प्रस्तावावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की देवभूमीतील तीर्थस्थाने चालवणाऱ्या मंदिर समित्या, धार्मिक संस्था आणि संत-महंतांच्या मतांचा सन्मान ठेवून सरकार आवश्यक ती कारवाई करेल. यावरून राज्य सरकार मंदिर समितीच्या निर्णयांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेत असल्याचे संकेत मिळत आहेत.

४८ मंदिरे, कुंड आणि धार्मिक स्थळांचा समावेश :

बद्रीनाथ-केदारनाथ (Badrinath-Kedarnath) मंदिर समितीच्या प्रस्तावात एकूण ४८ पवित्र मंदिरे, कुंड आणि धार्मिक स्थळे समाविष्ट आहेत, जिथे गैर-हिंदूंना प्रवेश निषिद्ध करण्याचा विचार आहे. यामध्ये प्रमुख ठिकाणे पुढीलप्रमाणे…

केदारनाथ धाम

बद्रीनाथ धाम

तुंगनाथ

मदमहेश्वर

त्रियुगीनारायण

नरसिंह मंदिर (जोशीमठ)

गुप्तकाशी येथील विश्वनाथ मंदिर

तप्त कुंड

ब्रह्मकपाल

शंकराचार्य समाधी

ही सर्व स्थळे केवळ पूजा-अर्चेसाठीच नव्हे, तर हिंदू धर्माच्या प्राचीन परंपरा, आख्यायिका आणि साधनेशी जोडलेली मानली जातात.

चार धामांचे धार्मिक महत्त्व काय?

बद्रीनाथ – भगवान विष्णूंचे निवासस्थान

केदारनाथ – भगवान शंकरांचे प्रमुख ज्योतिर्लिंग

गंगोत्री – गंगा मातेचे उगमस्थान

यमुनोत्री – यमुना मातेचे उगमस्थान

अशी श्रद्धा आहे की चार धाम यात्रा केल्याने मनुष्याच्या पापांचे क्षालन होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. त्यामुळेच या तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळांपेक्षा आध्यात्मिक साधनेचे केंद्र मानले जाते.

हे देखील वाचा….

Republic Day: ड्रोन, रोबोट, रॉकेट लाँचर्सपासून ते हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांपर्यंत, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सैन्याच्या नवीन ताकदीचे प्रदर्शन

PM Modi : बहुरंगी आणि राजस्थानी झलक… ; प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींच्या ट्रेडमार्क पगडीचा बोलबाला

Plane Crash : अमेरिकेत टेकऑफनंतर खाजगी जेट विमान कोसळले ; अपघातात विमानाला भीषण आग

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...