Ram Navami 2026 – विश्व हिंदू परिषद बजरंग दल, इंद्रायणीनगर प्रखंडतर्फे रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८.०० ते १०.३० या वेळेत दोन वयोगटांमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेसाठी अयोध्या मंदिर, रामायणातील प्रसंग, बाल हनुमान असे विविध विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना एकूण पाच बक्षिसांचे वितरण करण्यात आले. ह.भ.प. युवराज महाराज भगत यांनी आपल्या प्रवचन सेवेतून प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शक व प्रेरणादायी विचार मांडले. त्यानंतर विलास लांडगे यांनी मार्गदर्शन केले. प्रभू श्रीरामांची महाआरती व पाळणा सोहळा पार पडला. त्यानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड जिल्हा सहमंत्री नवनाथ साकोरे, बजरंग दल जिल्हा संयोजक अरविंद लंघे, गोपाळ नरवटे, निलेश रांधळ त्याचप्रमाणे श्रेयश सवयी, सुशांत घोरपडे, ऋतिक बिरादार या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात मदत केली. तसेच, इतर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बादरायणी, काशिनाथ शिंदे काका, देवराम चौधरी, रवींद्र कट्टी, रमेश बागडे, लोंढे हे प्रमुख कार्यकर्तेसुद्धा उपस्थित होते.