प्रभासच्या चित्रपटातून रकुल प्रीत सिंगला दाखवला बाहेरचा रस्ता

Rakul Preet Singh | अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने कन्नड आणि तेलुगू चित्रपटातून आपल्या करियरला सुरुवात केली. यानंतर तिने हिंदी चित्रपटांमध्ये काम करत बॉलीवूडमध्ये यश मिळवले. नुकतेच तिने तिच्या सुरुवातीच्या संघर्षांबद्दल खुलासा केला. चार दिवसांच्या शूटिंगनंतर प्रभासच्या चित्रपटातून तिला अचानक काढून टाकण्यात आले होते.
याबाबत रकुल म्हणाली, “प्रभासच्या एका तेलगू सिनेमात मी चार दिवस शूट केले आणि नंतर मला रिप्लेस करण्यात आले. या चित्रपटाचे नाव मिस्टर परफेक्ट होते. पण हे माझ्या चांगल्यासाठीच होते. त्यावेळी मी नवीन होते आणि कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होते. मी माझ्या परिक्षेचा अभ्यासपण सेटवर करत होते.” Rakul Preet Singh |
पुढे ती म्हणाली, “पहिला शेड्युल संपल्यानंतर जेव्हा मी दिल्लीला गेले तेव्हा मला कळलं की माझ्या जागी काजल अग्रवालला घेण्यात आले आहे. शूटिंगदरम्यान काजल आणि प्रभासची आणखी एक सिनेमा रिलीज झाला होता आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यामुळे निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटात त्याच कलाकारांची पुनरावृत्ती करण्याचा विचार केला. नवोदित मुलींना अनेकदा असे रिप्लेस करण्यात येते.” Rakul Preet Singh |
दरम्यान, रकुल प्रीत सिंगने 2009 मध्ये साऊथ चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर तिने 2014 मध्ये ‘यारिया’मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा:





