Rakul Preet Singh : ‘रकुल प्रीत’चा समर लुक चर्चेत! ब्लॅक टॉप आणि डेनिम जीन्समध्ये दिसला कुल अंदाज

Rakul Preet Singh – मॉडेलिंगच्या दुनियेपासून फिल्म इंडस्ट्री असा प्रवास करणाऱ्या अभिनेत्री ‘रकुल प्रीत सिंह’ला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सध्या रकुल हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका असून, आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहते.
रकुलने 10 जानेवारी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर रकुलप्रीतने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट आणि गाणे, वेब सिरीज दिले आहे.
रकुल प्रीत ही बॉलिवूडमधील एक आघाडीची नायिका असून, फॅन्सच्या मनात तिने आपले स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने साऊथ चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंत तिची जादू चालवली आहे. कधी चित्रपटांमुळे, कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी लूकमुळे ती चर्चेत येते.
रकुल इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असून, लाखोंच्या घरात अभिनेत्रीचा चाहता वर्ग आहे. अभिनेत्री कायमच तिच्या अनोख्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अलीकडेच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती कॅज्युअल लूकमध्ये दिसली आहे.
तिने काळ्या रंगाचा डीप नेक स्लीव्हलेस टॉप आणि हलक्या निळ्या रंगाची डेनिम जीन्स घातली आहे ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तसेच, तिचे गोंडस हास्य पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. अभिनेत्रीच निखळ हास्य पाहिल्यावर आपसूक चेहऱ्यावर हसू येतं. रकुल प्रीत या लूकमध्ये खूपच गोंडस दिसत आहे.
रकुल नेहमीच तिच्या स्टायलिश लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेते. यावेळीही तिच्या या शानदार अवताराने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेकांनी तिच्या या लूकवर जोरदार कमेंट देखील केल्या आहेत. सध्या तिचा लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.





