शुभमंगल सावधान..! ‘Rakul Preet Singh-Jackky Bhagnani’ अडकले लग्नबंधनात, गोव्यात थाटामाटात पार पडला सोहळा

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani । अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी पंजाबी रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकले आहेत. रकुल-जॅकीचा शाही विवाहसोहळा गोव्यात पार पडला. या लग्नसोहळ्याला रकुल-जॅकीचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
रकुल आणि जॅकी यांनी लग्नात तरुण तहिलयानी, शांतनु आणि निखिल, फाल्गुनी शेन पीकॉक, कुणाल रावल आणि अर्पिता मेहता या पाच डिझायनरने शेअर केलेले कपडे परिधान केले होते. स्वतः रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
View this post on Instagram
‘अशी’ सुरू झाली रकुल प्रीत सिंह अन् जॅकी भगनानी यांची लव्हस्टोरी
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. रकुल आणि जॅकी गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे रिलेशनमध्ये येण्याआधी रकुल आणि जॅकी एकमेकांचे शेजारी होते.
करोनाकाळात त्यांना एकमेकांबद्दल माहिती मिळाली. लॉकडाऊनमध्ये त्यांनी हँगआऊट करायला सुरुवात केली. त्यावेळी ते एकमेकांचे फक्त चांगले मित्र होते. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.
10 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांनी त्यांचं नातं जगजाहीर केलं. रकुलच्या वाढदिवशी जॅकीने खास रोमँटिक पोस्ट शेअर केली होती. रकुल आणि जॅकीने त्यांचं नातं जगजाहीर केल्यापासून प्रेक्षक त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा करत होते. आणि अखेर हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.





