Rakul Preet Singh : सूनबाई जास्ती श्रीमंत का सासरे.! वासू भगनानी की रकुल प्रीत सिंह, कोणाकडे आहे सर्वाधिक संपत्ती? आकडा पाहा…
रकुल प्रीत सिंहने स्वतःच्या करिअरच्या जोरावर मनोरंजनविश्वात मोठं स्थान निर्माण केलं आहे. तिने 2009 मध्ये कन्नड चित्रपट ‘गिल्ली’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

Rakul Preet Singh : बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत ग्लॅमरसोबतच कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहारांचीही नेहमीच चर्चा होत असते. अशातच सोमवारी, 28 सप्टेंबर 2026 रोजी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, तिचे सासरे आणि प्रसिद्ध निर्माते वासू भगनानी तसेच पॅनोरमा स्टुडिओजशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाने शोधमोहीम सुरू केल्याची बातमी समोर आली आणि चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली.
मुंबईतील सुमारे 12 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून, चित्रपटांच्या फायनान्सिंगशी संबंधित कथित परदेशी व्यवहार, आर्थिक नोंदी आणि कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याचे वृत्त आहे. मात्र, या चौकशीत नेमके काय निष्पन्न झाले आहे, याबाबत अद्याप अधिकृत अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही.
या कारवाईमुळे पुन्हा एकदा वासू भगनानी, जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंह हे कुटुंब चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. विशेष म्हणजे वासू भगनानी हे अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आहेत, तर रकुलने दक्षिण भारतीय चित्रपटांपासून बॉलिवूडपर्यंत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रकुलने 2024 मध्ये वासू भगनानी यांचा मुलगा आणि अभिनेता-निर्माता जॅकी भगनानीसोबत लग्न केले.
आता या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर वासू भगनानी आणि रकुल प्रीत सिंह यांच्याकडे किती संपत्ती आहे, त्यांच्या कमाईचे प्रमुख स्रोत कोणते आणि त्यांची लाइफस्टाइल किती आलिशान आहे? यावरही सोशल मीडियापासून मनोरंजनविश्वापर्यंत चर्चा रंगली आहे.
वासू भगनानी कोण आहेत?
वासू भगनानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील जुन्या आणि परिचित निर्मात्यांपैकी एक आहेत. पूजा एंटरटेनमेंट या बॅनरशी त्यांचं नाव दीर्घकाळ जोडलेलं आहे. त्यांच्या निर्मिती संस्थेने कुली नं. 1, हीरो नं. 1, बीवी नं. 1, मुझसे शादी करोगी, रहना है तेरे दिल में यांसारख्या चित्रपटांशी काम केलं आहे.
ही बातमी नक्की वाचा… : Rakul Preet Singh : बॉलिवूड हादरलं.! अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाचा छापा; वासू भगनानी यांच्यासह अनेक कलाकार रडावर, सिनेमांच्या आड पैशांचा खेळ उघड?
अलीकडच्या काळात बडे मियां छोटे मियांसारख्या मोठ्या प्रकल्पांशीही त्यांचा संबंध राहिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वासू भगनानी यांची संपत्ती सुमारे 2,500 कोटी असल्याचं बोललं जात आहे.
रकुल प्रीत सिंहची कोट्यवधींची कमाई
दुसरीकडे, रकुल प्रीत सिंहने स्वतःच्या करिअरच्या जोरावर मनोरंजनविश्वात मोठं स्थान निर्माण केलं आहे. तिने 2009 मध्ये कन्नड चित्रपट ‘गिल्ली’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करत तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत लोकप्रियता मिळवली.
2014 मध्ये यारियांमधून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर दे दे प्यार दे, रनवे 34, डॉक्टर जी यांसारख्या चित्रपटांत ती झळकली.रकुलच्या नेटवर्थबाबतही विविध सेलिब्रिटी-फायनान्स रिपोर्ट्समध्ये सुमारे 49 ते 50 कोटी रुपयांचा अंदाज दिला जातो.
रकुलची कमाई केवळ चित्रपटांपुरती मर्यादित नसल्याचे उपलब्ध माहितीतून दिसते. अभिनय आणि ब्रँड एंडोर्समेंटसोबतच तिचा फिटनेस व्यवसायाशीही संबंध आहे. BookMyShowच्या प्रोफाइलनुसार, ती F45 Trainingच्या तीन केंद्रांमध्ये भागीदार आहे.
याशिवाय जाहिराती, ब्रँड प्रमोशन आणि इतर व्यावसायिक उपक्रम हे सेलिब्रिटींच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत असतात. मात्र, रकुलच्या प्रत्येक व्यवसायातून नेमकं किती उत्पन्न मिळतं, याची अधिकृत माहिती सार्वजनिक नाही.
रकुल आणि जॅकी भगनानी हे दोघेही बॉलिवूडमधील ग्लॅमरस कपल्सपैकी एक मानले जातात. त्यांच्या महागड्या कार्स, आलिशान जीवनशैली आणि मुंबईतील प्रॉपर्टीजबाबत मनोरंजनविश्वात वेळोवेळी चर्चा होत असते.







