Rakul Preet Singh : अभिनेत्री ‘रकुलप्रीत सिंह’ गंभीर जखमी; जिममधील एक चूक पडली महागात !

Rakul Preet Singh Injured – हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंह’ आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. रकुलने 10 जानेवारी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
त्यानंतर रकुलप्रीतने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. आज अभिनेत्री बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री मध्ये समाविष्ट आहेत.
मात्र, अश्यातच अभिनेत्री ‘रकुलप्रीत सिंह’ बद्दल एक बातमी समोर आली आहे. रकुलप्रीत सिंह सोबत जिमध्ये वर्कआउट करताना एक घटना घडली आहे. ज्यामध्ये ती जखमी झाली आहे. यानंतर रकुलप्रीत सिंहला बेडरेस्टवर जावे लागले आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ही 5 ऑक्टोबर रोजी जिममध्ये वर्कआउट करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने बेल्ट न लावता 80 किलो वजन उचलले. दरम्यान, यावेळी तिला जखम झाली. यानंतर रकुल प्रीत सिंगची प्रकृती बिघडली.
डॉक्टरांनी सध्या अभिनेत्रीला बेडरेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. यानंतरही अभिनेत्री पेनकिलर घेऊन ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. सततच्या शूटिंगमुळे तिला पाठदुखीचा त्रास सुरु झाला.
त्यानंतर अभिनेत्रीने या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिची तब्येत आणखी बिघडली. स्वतः अभिनेत्री याबद्दल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.





