Rajnath Singh : पाकव्याप्त काश्मीरवरच पाकिस्तानसोबत चर्चा होईल; राजनाथ सिंह यांनी केले स्पष्ट
पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही. जर चर्चा झालीच, तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरवर होईल, जे भारताचा अविभाज्य भाग आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी ठणकावून सांगितले.

Rajnath Singh : पाकिस्ताने दहशतवादाला आपल्या राजकीय धोरणाचा भाग बनवलेले आहे. भारताचा इरादा पूर्णपणे स्पष्ट आहे. पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही. जर चर्चा झालीच, तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरवर होईल, जे भारताचा अविभाज्य भाग आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी ठणकावून सांगितले.
द्रास येथे कारगिल विजय दिनाच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी रविवारी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. याप्रंसगी लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ, लडाखचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना उपस्थित होते.
राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले, भारत नवनवीन कल्पनांचे मार्ग शोधत आहे, तर पाकिस्तान घुसखोरीचे मार्ग शोधत आहे. भारत जहाजे डिझाइन करत आहे, तर पाकिस्तान दहशतवादी डिझाइनमध्ये गुंतलेला आहे. भारत स्टार्टअप इकोसिस्टम उभारत आहे, तर पाकिस्तान दहशतवादी इकोसिस्टम उभारत आहे. भारत सेमीकंडक्टर बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती हल्लेखोर तयार करत आहे.
भारत अवकाश मोहिमांसाठी ओळखला जात आहे, तर पाकिस्तान प्रॉक्सी मोहिमा चालवत आहे. भारत अंतराळात उपग्रह पाठवत आहे, तर पाकिस्तान आजही दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्याचे काम करत आहे. भारत जगाला सॉफ्टवेअर देत आहे, तर पाकिस्तान जगाला स्लीपर सेल देत आहे. भारत डेटा सेंटर बनवत आहे, तर पाकिस्तान रेडिकल सेंटर बनवत आहे.
भारत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) द्वारे जगाला जोडत आहे, तर पाकिस्तान हवालाद्वारे दहशतवादाला जोडत आहे. हे स्पष्ट आहे की आपले मार्ग वेगवेगळे आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तान आपले नीच मनसुबे घेऊन आपल्या समृद्धीच्या मार्गात अडथळे निर्माण करत असेल, तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी आपल्या सेना सज्ज असल्याचा इशाराही (Rajnath Singh) त्यांनी दिला.






