राजकुमार राव बनणार ‘भगतसिंग’

मुंबई – बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव स्त्री 2 चे शूटिंग सुरू केल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राजकुमार राव लवकरच भगतसिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. 2017 मध्ये सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारल्यानंतर आता राजकुमार राव पडद्यावर भगतसिंग यांची व्यक्तिरेखा साकारण्याच्या तयारीत आहेत.
राजकुमार नवीन प्रोजेक्टबद्दल खूप उत्साहित आहे आणि स्क्रिप्टिंगमध्ये सक्रिय भाग घेत आहे. रिपोर्टनुसार, 2017 मध्ये सुभाष चंद्र बोस डिजिटल मिनी-सिरीजला भरपूर प्रेम मिळाल्यानंतर, आता राजकुमार राव भगत सिंगची भूमिका साकारताना दिसणार आहे.
क्रांतिकारी नेता भगतसिंग यांची भूमिका साकारण्यासाठी राजकुमार खूप उत्सुक आहे. हा प्रोजेक्ट अजूनही अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे, जिथे लेखकांची टीम सध्या भगतसिंग यांच्या जीवनातील कथांवर संशोधन आणि लेखन करण्यात व्यस्त आहे.
भगतसिंग प्रोजेक्टशी संबंधित एका सूत्राचे म्हणणे आहे की, ‘हा प्रोजेक्ट आघाडीच्या डिजिटल प्लेटरसाठी आखण्यात आला आहे. टीमला भगतसिंग यांच्यावर अशी सामग्री तयार करायची आहे जी यापूर्वी कधीही केली गेली नव्हती. पारंपारिक चित्रपटाच्या फॉर्मेटमध्ये न जाता, टीम एक लांबलचक स्वरूपाची कथा तयार करत आहे. सध्या हा प्रोजेक्ट अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असून तो लिहिण्यासाठी सुमारे 6 ते 8 महिने लागतील. राजकुमार राव स्त्री 2 जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून स्त्री 2 चे शूटिंग सुरू करणार आहे.





