Pune District : राष्ट्रीय पातळीवर राजगुरुनगर सहकारी बँकेची दुहेरी कामगिरी
Pune District : बँकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ठेवी, कर्जवाटप, नफा आणि थकीत कर्ज वसुलीमध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.

राजगुरुनगर : महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँक लि.ने आपल्या उत्कृष्ट आर्थिक कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरील दोन मानाचे पुरस्कार पटकावून सहकार क्षेत्रात नवा मानदंड निर्माण केला आहे. ‘भारत को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिट, प्रशिक्षण व पुरस्कार परिषद २०२६’ मध्ये बँकेला ‘बेस्ट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक’ तसेच ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
भारत नेटवर्क ग्रुप, एनएएफसीयुबी आणि पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लखनौ येथे आयोजित भव्य सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. आसाम स्टेट अॅपेक्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष तथा आमदार विश्वजीत फुकण, भारत नेटवर्क ग्रुपचे संस्थापक व संचालक डॉ. अनुपम गुप्ता आणि डॉ. आशिष श्रीवास्तव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बँकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ठेवी, कर्जवाटप, नफा आणि थकीत कर्ज वसुलीमध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. ग्रॉस प्रॉफिटमध्ये वाढ, कर्जवसुलीतील यश, नियंत्रित ग्रॉस एनपीए आणि नेट एनपीए शून्य टक्क्यांवर राखण्यात मिळवलेले यश या महत्त्वपूर्ण निकषांच्या आधारे बँकेची निवड करण्यात आली. पुरस्कार स्वीकारताना बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, उपाध्यक्ष रामदास धनवटे, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष तथा संचालक किरण आहेर, संचालक विजया शिंदे, राजेंद्र वाळुंज, राहुल तांबे, अरुण थिगळे, विनायक घुमटकर, अविनाश कहाणे, समीर आहेर, विजय डोळस, तज्ज्ञ संचालक अॅड. धर्मेंद्र खांडरे, गौतम कोतवाल तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाक्चौरे उपस्थित होते.
या राष्ट्रीय सन्मानामुळे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या कार्यक्षम व्यवस्थापनाला, ग्राहकाभिमुख धोरणांना आणि आर्थिक शिस्तीला देशपातळीवर मान्यता मिळाल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. बँकेच्या या यशामुळे सभासद, ग्राहक आणि ठेवीदारांमध्ये आनंदाचे वातावरण असून सहकार क्षेत्रात बँकेचे स्थान अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे.
कोट
“हा दुहेरी राष्ट्रीय सन्मान बँकेवरील ग्राहकांचा विश्वास, संचालक मंडळाचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याचा परिणाम आहे. आगामी काळातही बँक अधिक सक्षम आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहील.”
— सागर पाटोळे, अध्यक्ष, राजगुरुनगर सहकारी बँक लि.
हेही वाचा : Monsoon Update : राज्यातील २५ ते ३० जिल्ह्यांना यलो अलर्ट; १५ जूनपर्यंत मेघगर्जनेचा अंदाज





