Vaishnavi Hagavane death case : राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी; पोलिसांना अजित पवारांनी दिले कडक कारवाईचे आदेश

Rajendra Hagavane expelled from the party : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवनवे खुलास होत असून माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष असल्याचे समोर येत आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राजेंद्र हगवणे यांच्यावर बडतर्फची कारवाई करत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली.
राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुनील चव्हाण यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुणे पोलिस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अजित पवार नेहमी दोषींवर कारवाई करा असे म्हणतात, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. याही प्रकरणात दोषींवर कारवाई होईल, असे देखील सूरज चव्हाण म्हणाले. तसेच या प्रकरणावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले तटकरे?
मुळशीच्या हगवणे कुटुंबाचा राष्ट्रवादीशी सध्या कोणताही संबंध नाही. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदावर नियुक्त नव्हते, असे सुनील तटकरे म्हणाले आहेत. या प्रकरणात वैष्णवीचा सासरच्या लोकांनी छळ केला असल्याचा आरोप देखील होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून वैष्णवीचा साससा आणि दीर फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे चार पथक तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.





