Rajat Patidar : छत्तीसगडच्या तरुणाला अचानक येऊ लागले विराट-डिव्हिलियर्सचे कॉल! काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Rajat Patidar’s SIM number confusion : छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यातील एका तरुणाला क्रिकेटर रजत पाटीदारचा मोबाइल नंबर मिळाल्याने खळबळ उडाली. तांत्रिक चुकांमुळे ही घटना घडली, ज्यामुळे विराट कोहली, यश दयाल आणि एबी डी विलियर्स यांसारख्या क्रिकेट स्टार्सचे फोन मनीष बिसी या तरुणाला येऊ लागले. मनीष हा विराट कोहलीचा मोठा चाहता आहे. हा नंबर त्याला चुकून मिळाला होता. नंतर पोलिसांनी हा नंबर रजत पाटीदारला परत केला.
क्रिकेट स्टार्सशी झाला संवाद –
ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा 21 वर्षीय मनीष बिसीला क्रिकेटपटूंचे फोन येऊ लागले. मनीष हा मदागांव गावातील रहिवासी आहे. गरियाबंदचे एसपी निखिल राखेचा यांनी सांगितले की, हा नंबर मागील सहा महिन्यांपासून बंद होता. टेलिकॉम कंपनीच्या नियमांनुसार, सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वापरात नसलेला नंबर दुसऱ्या ग्राहकाला दिला जातो. याच कारणामुळे हा नंबर मनीषला मिळाला. एसपी म्हणाले, “हा एक व्हॉट्सअॅप नंबर होता आणि गेल्या सहा महिन्यांपासून वापरात नव्हता. आम्ही आता हा नंबर क्रिकेटर रजत पाटीदारला परत केला आहे.”
नवीन सिममुळे झाला गोंधळ –
ये कहानी जबरदस्त है 🚨
छत्तीसगढ़ के गरियाबंद के मनीष ने सिम ख़रीदा। कुछ दिन बाद मनीष को विराट कोहली और एबी डिविलियर्स से फ़ोन आया।
ऐसा इसलिए हुआ क्योंकि मनीष को जो नंबर अलॉट हुआ- वो RCB कैप्टन रजत पाटीदार का था। जो 90 दिन से एक्टिवेट नहीं था।
अब मनीष ने SIM लौटा दिया है। pic.twitter.com/7sBaObRWGR
— Govind Pratap Singh | GPS (@govindprataps12) August 10, 2025
मनीषने जूनच्या शेवटी देवभोग येथील एका मोबाइल दुकानातून रिलायन्स जिओचे नवीन सिम खरेदी केले होते. एका आठवड्यानंतर त्याचा मित्र खेमराजने व्हॉट्सअॅप सुरू करण्यात मदत केली. व्हॉट्सअॅपवर रजत पाटीदारचा फोटो आपोआप दिसू लागला. सुरुवातीला त्यांना वाटले की ही काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यानंतर विराट कोहली, एबी डी विलियर्स आणि इतर खेळाडूंच्या नावाने फोन येऊ लागले. सर्वजण त्याला रजत म्हणून संबोधत होते. सुरुवातीला मनीषला वाटले की कोणीतरी मस्करी करत आहे. त्यामुळे त्यानी 15 दिवस कॉल करणाऱ्यांशी गप्पा मारल्या.
हेही वाचा – Bangladesh Team : १६०० मीटर धावताना बांगलादेशच्या संघाला फुटला घाम! आशिया कपपूर्वी फिटनेस टेस्ट ठरली फेल
अखेर पाटीदारला मिळाले जुने सिम –
जेव्हा रजत पाटीदारला त्याचा जुना नंबर वापरता आला नाही, तेव्हा हा प्रकार गंभीर बनला. त्यानी मध्य प्रदेश सायबर सेलशी संपर्क साधला. सायबर सेलने गरियाबंद पोलिसांशी चर्चा केली. पोलिसांनी गावात जाऊन सिम जप्त केले आणि नंतर ते रजत पाटीदारला पाठवले. मनीष आणि त्याच्या मित्राने सांगितले की, ही घटना त्यांच्यासाठी अविस्मरणीय आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की, रजत पाटीदार कधीतरी त्यांना भेटेल. दोघेही क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत.





