Rajasthan Voting : 5 वाजेपर्यंत राजस्थानमध्ये 68.24 टक्के मतदान; आमदारांचं भविष्य मतपेटीत बंद

जयपूर – राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुसाठी आज मतदान पार पडले आहे. यात विधानसभेच्या 200 जागांपैकी 199 जागेवर आज मतदान झाले आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून ते सायकाळी 5 वाजेपर्यंत 68.24 टक्के मतदान झाले आहे. राजस्थानमध्ये मतदानाच्या दिवशी विविध भागातून काही तुरळ हिंसाचाराच्या घटनाही समोर आल्या आहेत.
या निवडणुकीत 22 जागांवर व्हीआयपी नेते निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्या 22 जागांवर सर्वांची लक्ष लागले आहे.काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांमध्ये राजस्थानात मुख्य लढत आहे. त्यामुळे 3 डिसेंबरला कोणता पक्ष विजयी होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेस नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधरा राजे, काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे राजस्थानातील प्रमुख नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरुन पुन्हा आपले नशीब आजमावत आहेत.
यापूर्वी 2013 मध्ये राजस्थानमध्ये सर्वाधिक 75.69 टक्के मतदान झाले होते. यानंतर, 2018 मध्ये ते 74.71 टक्के होते. पण, यावेळचे मतदान आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीत तिजारा येथे 82 टक्के मतदान झाले होते. मागील निवडणुकीत शिवला 79.77 टक्के तर बायतूमध्ये 82.55 टक्के मतदान झाले होते.गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासराच्या लक्ष्मणगड जागेवर 74 टक्के मतदान झाले होते. यावेळी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाने 72 टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे.
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान
शहर टक्के
झालवार 73.37
जैसलमेर 76.57
अजमेरमध्ये 65.75
अलवरमध्ये 69.71
उदयपूर 64.98
पोकरण 81.12
हनुमानगढ 75.75
ढोलपूर ७4.11





