Ashok Gehlot : क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांची आमदारकी रद्द करा; राज्यसभा निवडणुकीवरून अशोक गेहलोत यांची टीका
देशभरातील अनेक राज्यांमध्ये नुकत्याच राज्यसभा निवडणुका (Ashok Gehlot) पार पडल्या आणि हरियाणा, ओडिशा व बिहारमधील क्रॉस-व्होटिंग काँग्रेस पक्षासाठी नुकसानकारक ठरले आहे.

Ashok Gehlot : देशभरातील अनेक राज्यांमध्ये नुकत्याच राज्यसभा निवडणुका (Ashok Gehlot) पार पडल्या आणि हरियाणा, ओडिशा व बिहारमधील क्रॉस-व्होटिंग काँग्रेस पक्षासाठी नुकसानकारक ठरले आहे.
हरियाणात काँग्रेस पक्षात यापूर्वीही क्रॉस-व्होटिंग झाले आहे, परंतु यावेळी हा मुद्दा अधिकच चिघळत असल्याचे दिसत आहे. क्रॉस-व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते करत आहेत.
दरम्यान, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी क्रॉस-व्होटिंग करणाऱ्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करावे, असे म्हटले आहे. अशोक गेहलोत म्हणाले की, काँग्रेस आमदारांनी केलेले क्रॉस-व्होटिंग अत्यंत दुर्दैवी आहे. आमचे नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहेत. अशा वेळी आमदार क्रॉस-व्होटिंग करण्याचे धाडस करत आहेत, हे अनाकलनीय आहे.
यामुळे त्यांना २०१८ ते २०२३ दरम्यान राजस्थानमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकांची आठवण झाली. तेव्हा आम्ही पक्षश्रेष्ठी आणि पक्षाप्रती आमची वचनबद्धता दाखवून दिली होती. काँग्रेसकडे केवळ १०२ आमदार असूनही, १२६ आमदारांनी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारांच्या बाजूने मतदान केले होते. हे कोणत्याही लोभाशिवाय किंवा लालसेशिवाय, केवळ पक्षश्रेष्ठींनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासातून निर्माण झालेल्या सद्भावनेमुळे शक्य झाले.
नियम बदलण्याची गरज Ashok Gehlot
गेहलोत (Ashok Gehlot) असेही म्हणाले, आता सर्वात मोठी गरज राज्यसभा निवडणुकीतील मतदानाचे नियम बदलण्याची आहे वा याची मागणी काँग्रेसने केली पाहिजे. राज्यसभा निवडणुकीत कोणत्याही आमदाराने पक्षाच्या विरोधात मतदान केल्यास, त्याचे सदस्यत्व रद्द केले पाहिजे.






