राजस्थानमध्ये बस-कारचा भीषण अपघात ; ५ जणांचा जागीच मृत्यू , १५ जण गंभीर जखमी

Rajasthan Accident । राजस्थानमधील करौलीमध्ये आज सकाळी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अनेक जण गंभीर जखमी देखील झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघातात कारचा चक्काचूर Rajasthan Accident ।
करौली येथील रस्ता अपघाताची ही घटना एवढी भीषण होती की, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलीस पथकाने स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
#WATCH करौली, राजस्थान: कार और बस की टक्कर में 5 लोगों की मृत्यु हुई। (24.12)
जिला अस्पताल के मुख्य चिकित्सा अधिकारी रमेश मीना ने बताया, “करौली गंगापुर मार्ग पर एक कार और बस की टक्कर में 5 लोगों की मृत्यु हो गई है। सभी एक ही परिवार के हैं। पुलिस द्वारा प्राप्त सूचना के अनुसार वे… pic.twitter.com/ylg5nFUVra
— ANI_HindiNews (@AHindinews) December 25, 2024
सर्व मृत एकाच कुटुंबातील Rajasthan Accident ।
करौली जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी रमेश मीना यांनी सांगितले की, “करौली गंगापूर रोडवर कार आणि बस यांच्यात झालेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ते कैलादेवीच्या दर्शनासाठी जात असताना बसमधील १५ जण जखमी झाले आहेत.
हेही वाचा
केंद्राने नो-डिटेंशन पॉलिसी’ रद्द का केली? नेमकं कारण काय? ; ‘या’ राज्यांनी पॉलिसी रद्द केली तर ‘या’ राज्यांनी सुरूच ठेवली
अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचा मोठा एअरस्ट्राईक ; एकच कुटुंबातील ५ जणांसह १५ जणांचा मृत्यू





