अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचा मोठा एअरस्ट्राईक ; एकच कुटुंबातील ५ जणांसह १५ जणांचा मृत्यू

Pakistan Airstrikes in Afghanistan। नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटनांमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. आता ताज्या घडामोडीत पाकिस्तानने अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले आहेत. माध्यमातील माहितीनुसार, मंगळवारी रात्री हा हल्ला करण्यात आला. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. यामध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू Pakistan Airstrikes in Afghanistan।
अफगाणिस्तानात लपून बसलेल्या पाकिस्तानी तेहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानने हा हवाई हल्ला केला असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हल्ल्यात लमनसह सात गावांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. या हवाई हल्ल्यानंतर मोठे नुकसान झाले असून परिसरात तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले पाकिस्तानी सुरक्षा अधिकारी? Pakistan Airstrikes in Afghanistan।
पाकिस्तानने शेजारच्या अफगाणिस्तानमधील अनेक संशयित पाकिस्तानी तालिबान संशयित ठिकाणांना लक्ष्य केले, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांचे एक प्रशिक्षण केंद्र पूर्णपणे नष्ट केले आणि काही बंडखोरांना ठार केले. बॉम्बस्फोटासाठी पाकिस्तानी विमानांचा वापर करण्यात आला.
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पक्तिका प्रांतातील डोंगराळ भागात हे हल्ले करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी अरब न्यूजला या गोष्टी सांगितल्या.
मार्च महिन्यापासून पाकिस्तानी तालिबानच्या कथित तळांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. मार्चच्या सुरुवातीला पाकिस्तानने कबूल केले होते की त्यांनी अफगाणिस्तानमधील सीमावर्ती भागात तालिबानच्या ठाण्यांवर हल्ले केले होते.
अफगाणिस्तानची प्रतिक्रिया
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांचा निषेध केला आणि म्हटले की, बॉम्बस्फोटांमध्ये महिला आणि मुलांसह नागरिकांना लक्ष्य केले गेले. बहुतेक बळी वझिरीस्तान भागातील शरणार्थी होते, “अफगाणिस्तानचे इस्लामिक अमिरात हे सर्व आंतरराष्ट्रीय तत्त्वांच्या विरुद्ध क्रूर कृत्य मानते आणि त्याचा तीव्र निषेध करते,” असे मंत्रालयाने म्हटले आहे.





