राजन शिंदे यांना मोठी जबाबदारी देणार – डॉ. सुजय विखे

संगमनेर – संगमनेरात युवकांनी आणि लाडक्या बहिणींनी एक भाऊ अमोल खताळ यांना आमदार केले. आता पुन्हा दुसऱ्या लहान भावाच्या पाठीशी उभे रहा. तालुक्यातील मोठी संधी राजन शिंदे यांना आपण देऊ असे वक्तव्य माजी खा. सुजय विखें यांनी ‘न्यु होम मिनिस्टर’या कार्यक्रमात केले. त्यामुळे, लवकरच राजन शिंदे यांना मोठी संधी मिळणार असल्याची चर्चा तालुक्यात आता होत आहे.
राजन दादा युवामंच आयोजीत ‘होम मिनिस्टर’ खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मंगळवारी कुबेर लॉन्स येथे पार पडला. याप्रसंगी तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा महिलांची उच्चांकी गर्दी पाहायला मिळाली. या कार्यक्रमात माजी खा. सुजय विखें, आ. अमोल खताळ हे सपत्नीक उपस्थित होते. यावेळी आ.अमोल खताळ यांनी राजन शिंदे यांचे कौतुक केले की, राजन हा तरुण सर्वांच्या अडचणीत पाठीशी उभा राहतो. स्वतःच्या खर्चातून पाण्याचे टँकर दिले. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली. त्याचे सामाजिक कार्य मोठे आहे.
या कार्यक्रमात सिने अभिनेते क्रांतीनाना माळेगावकर आणि त्यांची कन्या सह्याद्री माळेगावकर यांनी जमलेल्या हजारो महिलांची मने जिंकली. या कार्यक्रमात चार ते पाच हजार महिला उपस्थित होतात. तर प्रत्यक्षात या कार्यक्रमात हजार महिलांनी विविध खेळा मध्ये सहभाग नोंदवला. यावेळी अभिनेत्यासह कार्यक्रमाचे आयोजक राजन शिंदे यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती.
या कार्यक्रमात क्रांतीनाना माळेगावकर यांनी विविध खेळ घेतले. यामध्ये पहिला क्रमांक सविता बोधक यांना फ्रीज तर दुसरा क्रमांक नीलिमा नागरे याना टीव्ही तिसरा क्रमांक वनिता आहेर याना वॉशिंग मशीन चौथा क्रमांक वैशाली कानवडे याना एअर कुलर मिळाले आहे. तर शेकडो महिलांना पैठणी आणि छोटी भेट वस्तू मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन आला.





