राज-उद्धव एकत्र…! मविआचं पुढं काय? विजय वडेट्टीवार म्हणाले… आधी त्या दोघांचं

Raj Thackeray | उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. दोन्ही ठाकरे बंधुंकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या. ज्यावरून काहींनी टीका केली तर काही दोघांच्याही एकत्र येण्याच्या चर्चांचे स्वागत केले.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावरून काँग्रेसकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया देण्यात आली आहे. राज ठाकरे – उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत काँग्रेसची भूमिका स्वागताची आहे. राज-उद्धव एकत्र आले तर मविआचं काय करायचं ते ठरवू. आधी त्या दोघांचं काय ते ठरवू द्या, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
विजय वडेट्टीवार म्हणाले, महाविकास आघाडी ही काही २०-२५ वर्षांची नाही. दोन पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्या वेळची राजकीय गरज म्हणून मवीआ तयार झाली. राज-उद्धव एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय करायचं ते ठरवू. आधी त्या दोघांचं काय ते ठरू द्या. दोन भाऊ एकत्र येत असतील तर आनंदच आहे. त्यात आम्ही पडणार नाही. असं विजय वडेट्टीवार म्हणाले.





