‘मुंबईच्या समुद्रात डुबे-डुबे कर मारू’, राज ठाकरेंचा भाजप खासदार निशिकांत दुबेंना इशारा

Updated On:

मिरा भाईंदर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या मराठीविरोधी वक्तव्याला सणसणीत प्रत्युत्तर दिले. मिरा भाईंदर येथील जाहीर सभेत ठाकरे म्हणाले, “दुबे म्हणतो, मराठी माणसाला पटकून-पटकून मारू? मी सांगतो, दुबे, तू मुंबईत ये, इथल्या समुद्रात तुला डुबे-डुबे कर मारू!” ठाकरेंच्या या इशाऱ्याने सभास्थानी एकच जल्लोष झाला.

निशिकांत दुबे यांनी काही दिवसांपूर्वी मराठी माणसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करत ठाकरे बंधूंना बिहार, उत्तर प्रदेशात येऊन हिंदी, उर्दू भाषिकांना मारण्याचे आव्हान दिले होते. यावर राज ठाकरे म्हणाले, “हिंदी चॅनेलवाले जाणीवपूर्वक मराठीविरोधी प्रचार करतात. बिहारात ९९ टक्के लोक मातृभाषा बोलतात, हिंदी नाही. हनुमान चालिसा अवधीत आहे, हिंदीत नाही. मराठीचा इतिहास समजून घ्या. माझे हिंदी, उर्दूसह सर्व भाषांवर प्रेम आहे, पण लादणार असाल तर खपणार नाही.

”ठाकरे यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीवर होणारा हल्ला हा सुनियोजित षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप केला. “मिरा भाईंदर ते पालघरपर्यंतचे मतदारसंघ अमराठी करुन हा पट्टा गुजरातला जोडण्याचा डाव आहे. शिवरायांचे हिंदवी स्वराज्य हिंदी प्रांतावर सत्ता गाजवण्यासाठी नव्हते,” असे ते म्हणाले. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या सभेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता.

आणखी संबंधित बातम्या

Sanjay Shirsat : "पब्लिसिटीसाठी हवा करण्याचा मोर्चा"; संजय शिरसाट यांची ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चावर टीका

2026-10-04 21:24:47

Sanjay Shirsat : "पब्लिसिटीसाठी हवा करण्याचा मोर्चा"; संजय शिरसाट यांची ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चावर टीका

Ashish Shelar : ठाकरे बंधूनी काढलेली निषेध रॅली म्हणजे कोल्ह्यांचा मोर्चा होता; मंत्री आशिष शेलार यांची टीका

2026-10-04 17:06:42

Ashish Shelar : ठाकरे बंधूनी काढलेली निषेध रॅली म्हणजे कोल्ह्यांचा मोर्चा होता; मंत्री आशिष शेलार यांची टीका

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

2026-10-04 14:53:43

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले....

2026-10-04 13:16:25

Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले....

Mumbai Morcha: ठाकरे बंधुंची ज्ञानेश कुमारांविरोधात आज मुंबईत 'गर्जना'; काँग्रेस-शरद पवार गटाचा मोर्चाला पाठिंबा

2026-10-04 08:18:00

Mumbai Morcha: ठाकरे बंधुंची ज्ञानेश कुमारांविरोधात आज मुंबईत 'गर्जना'; काँग्रेस-शरद पवार गटाचा मोर्चाला पाठिंबा