“राज ठाकरेंचा पक्ष दिल्लीच्या ऑक्सिजनशिवाय जगू शकत नाही”; राऊतांचा शिंदे-राज भेटीवर घणाघात

Sanjy Raut – अमित शहा हे महाराष्ट्रात तीन पक्ष चालवतात. अधूनमधुन ते रामदास आठवले यांचाही पक्ष चालवतात. आता राज ठाकरे यांच्या पक्षाविषयी मी फार काही सांगू शकत नाही. त्यांचा पक्ष सुद्धा भाजपचा मित्र पक्षच आहे.
त्यांची ध्येय धोरणे काय असावीत हे सुद्धा दिल्लीतूनच ठरते. सत्तेच्या ऑक्सिजनशिवाय ते जगू शकत नाही, अशी आगपाखड उद्धवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी केली.
मंगळवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेचे सर्वेसर्वा असलेल्या राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. यावेळी मंत्री उदय सामंत तथा अमित ठाकरे देखील उपस्थित होते. काही दिवसांपुर्वी उदय सामंत यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
त्यावेळीच त्यांनी मी एकनाथ शिंदेंची परवानगी घेवूनच राज ठाकरेच्या भेटीला आलो असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या अनुशंघाने ही भेट झाली असल्याची चर्चा रंगली आहे.
यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. राऊत यांनी यावेळी बोलताना नाशिक येथील दर्ग्यावर झालेल्या कारवाईवर देखील टीका केली. ते म्हणाले, शिवसेनेच्या शिबिरावरून लक्ष हटवण्यासाठीच दर्गावर कारवाई करण्यात आली.
त्यांना देशच तोडायचा आहे तर दर्गा तोडल्यावर काय आर्श्चय वाटायचे. १५ दिवसांपूर्वीच आजच्या कारवाईचा मुहूर्त काढला गेला होता, असे म्हणताना त्यांनी प्रशासनावर देखील टीकेचे आसूड ओढले.





