Raj Thackeray : सत्तेत असूनही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे; गोकुळमधील हस्तक्षेपावरून राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Raj Thackeray : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'वर मागील दाराने संचालक नियुक्त करून वर्चस्व मिळवण्याच्या महायुती सरकारच्या प्रयत्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे.

Raj Thackeray : भाजप हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. दुसरीकडे कुठल्याका मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवले ते सर्व विरोधी पक्षांनी 12 वर्ष सहन केले. (Raj Thackeray)
मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे, तर भाजपने पण सहन करायला शिकले पाहिजे, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या दुतोंडी भूमिकेवर हल्लाबोल करताना गोकुळमधील रडीचा डाव बंद करावा, अशा शब्दात फटकारले. (Raj Thackeray)
कोल्हापूर जिल्ह्यातील साडे पाच लाख शेतकऱ्यांचा जनादेश डावलून गोकुळ ताब्यात घेण्यासाठी महायुतीने मागच्या दाराने केलेल्या मनसुब्यांवर राज ठाकरे यांनी सडकून प्रहार केला आहे. यासदंर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. (Raj Thackeray)
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे 12 विरोधात सतेज पाटील पॅनलचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) 5 संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही? (Raj Thackeray)
बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. (Raj Thackeray)
गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भाजप समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं!, असा टोलाही त्यांनी लगाविला. (Raj Thackeray)
Raj Thackeray : ऐन दिवाळीत राज ठाकरेंचे मनसैनिकांना मोठे आवाहन; घेतला ‘हा’ मोठा निर्णय





