राज ठाकरेंनी घेतली टिळक कुटुंबीयांची भेट; ‘मुक्ता टिळक’ यांच्या आठवणींना दिला उजाळा

मुंबई – सलग चार वेळा नगरसेवक राहिलेल्या, महापालिकेतील विविध समित्यांसह महापौर पदही भूषवलेल्या आणि कसबा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार ‘मुक्ता टिळक’ यांचे 22 डिसेंबर (गुरूवारी) निधन झाले आहे. कर्करोगाने खासगी रुग्णालयात त्यांचं निधन झाले. त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश, मुलगी चैत्राली, मुलगा कुणाल, जावई, सून असा परिवार आहे. भाजपच्या अत्यंत धडाडीच्या, तळागाळासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ख्याती होती.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी राज ठाकरे म्हणाले, “मी मागील आठवड्यात पुण्यातच होतो. मी ताईंना काही महिन्यांपूर्वी येथेच भेटलो’ असल्याची आठवण राज ठाकरे यांनी यावेळी सांगितली.
तर मध्यंतरी विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या मतदानला स्वतःहून गेल्या होत्या. मला मतदानाला जायच असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. यावेळी राज ठाकरेंनी मुक्ता टिळक यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक, रोहित टिळक आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, मुक्ता टिळक पुण्याच्या सामाजिक राजकीय पटलावर संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळखल्या जात होत्या. नगरसेवक, महापौर आणि आमदार म्हणून त्यांनी अनेक चांगले कामे केली आहेत. टिळकांचा वासरा त्यांनी चांगला निभावला. सामान्य कार्यकर्तीपासून मोठ्या पदावर स्वत:च्या मेहनतीने त्या पोहचल्या होत्या.





