Sanjay Mishra : ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ मराठी नाटक रंगभूमीवर प्रचंड गाजलं. आता हे अजरामर झालेलं नाटक थेट हिंदीत रंगभूमी जाण्यासाठी सज्ज आहे. खरंतर अनेक भाषांमध्ये या नाटकाचे सादरीकरण झाले आहे. मात्र, हिंदी भाषेत हे नाटक पहिल्यांदाच हिंदी रंगभूमीवर सादर होणार आहे. घाशीराम कोतवाल हे नाटक दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल हे दिग्दर्शिक करत आहेत. या नाटकात बॅालिवूड कलाकार संजय मिश्रा मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर याची देखील महत्वाची भूमिका आहे. या नाटकाविषयी गप्पा मारताना संजय मिश्रा यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक मजेशीर किस्से शेअर केले. तसेच आयुष्यातील आलेल्या दुःखद प्रसगांना त्यांनी कशाप्रकारे तोंड दिलं. याविषयी देखील त्यांनी अनेक गोष्टींचा उलघडा केला. त्यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनाला मुलाखत दिली. याच मुलाखतीत संजय मिश्रांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीचा एक किस्सा शेअर केला. तुम्हाला माहीत होतं का? ते मनसे नावाच्या एका राजकीय पक्षाशी जोडलेले आहेत? आणि मराठी नाही बोललं तर लोक खळखट्ट्याक करतात… या प्रश्नावर अभिनेते संजय मिश्रांनी राज ठाकरेंच्या भेटीचा एक किस्सा शेअर केला. संजय मिश्रांनी सांगितला राज भेटीचा तो किस्सा राज ठाकरेंनी मला भेटायला बोलावलं. तिथे , आज संजय आलाय, आपण सर्व हिंदीत बोलूयात… मला एक गोष्ट खूप चांगली वाटतेय की, एकीकडे अशा प्रकारची चांगली गोष्ट होतेय आणि आपण सगळे एकत्र येऊन एक प्रयत्न करत असू की हिंदीत मराठी नाटक यातही महत्त्वाचा वाटा अभिजीत पानसेंचा आहे, असंही संजय मिश्रांनी सांगितलं. मराठी रंगभूमीवर गाजलेलं नाटक ‘घाशीराम कोतवाल’ हे मराठी रंगभूमीवरील अत्यंत महत्वाचं आणि गाजलेलं नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग होऊन आता ५२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या नाटकाचं कथानक ऐतिहासिक आणि सामाजिक मुद्द्यांवर आधारित आहे. पेशवेकालीन पुण्यातील राजकीय आणि सामाजिक सत्तासंघर्षांचे चित्रण नाटकात दाखविण्यात आलं होतं. आता हे नाटक हिंदी रंगभूमीवर सादर केले जाणार असून, या नाटकात अभिनेते संजय मिश्रा मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे या नाटकाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. हेही वाचा : “तीन-तीन कोटी खर्च होतो, 100 बोकडं…”; संजय गायकवाडांच्या विधानाची चर्चा, वडेट्टीवार म्हणाले “त्यांना खोके आणि बोक्यांची सवय..”