राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर; शेकापच्या वर्धापन दिन सोहळ्यात राहणार उपस्थित

Raj Thackeray and Sanjay Raut | शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन मेळावा यावर्षी पनवेल येथे आयोजित केला आहे. या निमित्त शनिवारी २ ऑगस्ट रोजी शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्यासह अन्य दिग्गज मंडळी कार्यकर्त्यांना संबोधित करतील. या मेळाव्याच्या मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत.
विशेष म्हणजे पनवेल येथे होणाऱ्या शेकापच्या वर्धापन दिन मेळाव्यात पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गट एकत्र पाहायला मिळणार आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना या मेळाव्यासाठी आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं. राज ठाकरेंसोबत शिवसेना (उबाठा) पक्षाचे संजय राऊत देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे.
जयंत पाटील यांच्या आमंत्रणाचा मान राखून राज ठाकरे हे शनिवारी 2 ऑगस्टला शेकापच्या वर्धापनदिनी मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला राजकीय दृष्ट्या पाहू नये, असे आवाहन शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.
पक्ष फुटीनंतर शेकापचा वर्धापन दिन मेळावा
मागील वर्षी शेकापचा वर्धापन दिन मेळावा पंढरपूर येथे पार पडला होता. त्यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आणि त्यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. तेव्हापासूनच पक्षातील मोठया फुटीचे संकेत मिळत होते. Raj Thackeray and Sanjay Raut |
त्यानंतर पंडित पाटील, आस्वाद पाटील यांच्यासह पाटील कुटुंबातील प्रमुख मंडळी पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तसेच पनवेल मधून जे एम म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच शेकापचा वर्धापन दिन मेळावा
होणार आहे. तसेच यावेळी आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने नव्या राजकीय समीकारणांची गणित आखली जाणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Raj Thackeray and Sanjay Raut |
हेही वाचा :
Donald Trump | भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याची शक्यता; डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक दावा





