पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर राज कुंद्राचा सोशल मीडियाला राम-राम

मुंबई – पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वादग्रस्त पती ‘राज कुंद्रा’चे नाव आल्यामुळे एक खळबळ उडाली होती. त्यानंतर राज कुंद्राला याप्रकरणी अटक झाली होती. नंतर तब्बल दोन महिन्यांनंतर त्याला जामीनही मंजूर झाला होता.
आपल्या आयुष्यात घडलेल्या या सर्व घटनांनंतर राज कुंद्राने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्याने सोशल मीडियावरुन एक्झिट घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर राज कुंद्रा हा अद्याप समोर आलेला नाही.
View this post on Instagram
राज कुंद्राने त्याचे इन्स्टाग्राम आणि ट्वीटर अकाऊंट डिलीट केले आहे. शिल्पा शेट्टीप्रमाणे राज कुंद्राही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. मात्र पॉर्नोग्राफी नेटकऱ्यांनी त्याला फार ट्रोल केले होते. आणि त्यामुळे राज कुंद्राने सोशल मीडियाला राम-राम ठोकण्याचा निर्णय घेतला असावा.





