अखेर राज कुंद्राला जामीन मंजूर

मुंबई – पॉर्नोग्राफी प्रकरणी अखेर राज कुंद्रा आणि रायन थॉर्प या दोघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टातून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने राज कुंद्राला जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्राला 19 जुलैला रात्री उशीरा अटक करण्यात आली होती. तसेच तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देखील कोर्टाने दिले आहेत.
पॉर्नोग्राफी प्रकरणातील अटकेनंतर जुलै महिन्यापासून तुरूंगात असलेल्या राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी सुमारे दिड हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यात राज कुंद्राचा नातलग प्रदीप बक्षी आणि एक अन्य आरोपी यश ठाकूर यांचा समावेश आहे.
या सर्वांवर पिडीत मुलींचा लैंगिक छळ करणे, त्यांची फसवणूक करणे, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार पोलिसांनी गंभीर आरोप आहेत.





