Shilpa Shetty and Raj Kundra | अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. या फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी सध्या मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. राज कुंद्रापाठोपाठ आता शिल्पा शेट्टीची आर्थिक गुन्हे शाखेने कसून चौकशी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांचं आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक सोमवारी शिल्पाच्या घरी पोहोचलं आणि 4:30 तास तिची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे जबाब नोंदवले आहेत. चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टीनं तिच्या जाहिरात कंपनीच्या बँक खात्यातील कथित व्यवहारांची माहिती पोलिसांना दिली. चौकशीदरम्यान शिल्पानं पोलिसांना अनेक कागदपत्रं दिली, ज्यांची पडताळणी सुरू आहे. राज कुंद्राने पोलिसांना काय सांगितले? राज कुंद्राने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, फसवणुकीची तक्रार दाखल करणारे दीपक कोठारी यांनी एका एनबीएफसीकडून 60 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यानंतर कोठारीच्या कंपनीत हे इक्विटी म्हणून समायोजित करण्यात आलं. या रकमेपैकी 20 कोटी रुपये सेलिब्रिटी प्रमोशन, ब्रॉडकास्ट आणि इतर खर्चासाठी वापरले. राज याने पोलिसांना प्रमोशनचे फोटो दाखवल्याची माहिती देखील समोर येत आहे. बिपाशा बासू आणि नेहा धुपिया यांना देखील यासाठी पैसे देण्यात आले. Shilpa Shetty and Raj Kundra | दरम्यान, ज्या कंपनीची सध्या चौकशी सुरु आहे, त्या कंपनीची शिल्पा मोठी शेअर होल्डर आहे. विशेष म्हणजे, शेअर होल्डर असून देखील शिल्पाने सेलिब्रिटी फी घेतली आहे. ज्याला खर्चात दाखवण्यात आलं असून ते निधीचा गैरवापर दर्शवते. त्यामुळे अभिनेत्रीची देखील चौकशी सुरु आहे. Shilpa Shetty and Raj Kundra | काय आहे प्रकरण? आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट 2025 मध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर 60.4 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे आरोप दाखल केले. सप्टेंबर महिन्यात त्यांच्या विरोधात लूकआउट नोटीस देखील जारी करण्यात आली. यूवाय इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक दीपक कोठारी यांनी तक्रार दाखल केली, ज्यामध्ये राज आणि शिल्पाने 2015 ते 2023 दरम्यान त्यांना व्यवसायात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे एकंदरीत शिल्पा शेट्टीच्या अडणचीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसत आहे. Shilpa Shetty and Raj Kundra | हेही वाचा : “डोक्याला थोडा मार लागलाय…” ; कार अपघातानंतर विजय देवरकोंडाची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला? चाहत्यांना केलं ‘हे’ आवाहन