लखनौ – मतदान केंद्रात शिरून मतदानाच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न तसेच पोलींग एजंटशी गैरव्यवहार केल्याच्या एका जुन्या प्रकरणात अभिनेते आणि कॉंग्रेसचे नेते राज बब्बर यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ज्या वेळी हा प्रकार घडला होता तेव्हा राज बब्बर हे समाजवादी पक्षाचे उमेदवार होते.
लखनौच्या एमपी/एमएलए न्यायालयाने राज बब्बर यांना साडेआठ हजार रूपये दंडही ठोठावला आहे. राज बब्बर आता कॉंग्रेस पक्षात असून ते पक्षाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्षही होते. ज्या प्रकरणात त्यांना शिक्षा झाली ते प्रकरण 1996 मधील आहे.
लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर; सकाळपासून शरीराची कोणतीच हालचाल नाही
मतदान अधिकारी श्रीकृष्ण सिंह राणा यांनी राज बब्बर, अरविंद यादव यांच्यासह अनेक जणांच्या विरोधात तेव्हा तक्रार दाखल केली होती.
या लोकांनी मतदान केंद्रात घुसून गैरवर्तन केले. पोलींग एजंटला मारहाण केली व प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील मतफुटीवर काँग्रेस नेतृत्वाकडून ऍक्शन; त्या ९ आमदारांना…