प्रतीकने वडील राज बब्बर यांना लग्नात न बोलवण्यामागचे सांगितले कारण…

Pratik Babbar | दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर याचा फेब्रुवारी महिन्यात प्रिया बॅनर्जीसोबत विवाह पार पडला. मात्र या लग्नात त्याने वडील राज बब्बर आणि त्याचे भावंड उपस्थित नव्हते. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगली होती. यानंतर आता प्रतीकने कुटुंबाला त्याच्या लग्नात न बोलवण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
प्रतीकने आई स्मिता पाटील यांच्या घरी लग्न केलं होते. प्रतीकची आई (स्मिता पाटील) आणि सावत्र आई नादिरा बब्बर यांच्यातील नातेसंबंध ठीक नव्हते. त्यामुळे स्मिता पाटील यांच्या घरी वडील आणि त्यांच्या कुटुंबाला लग्नासाठी बोलावणं प्रतीकला योग्य वाटलं नाही, असा खुलासा त्याने एका मुलाखतीदरम्यान केला आहे. Pratik Babbar |
प्रतीकने सांगितले की, “माझी आई आणि माझ्या वडिलांची पत्नी यांच्यात खूप समस्या होत्या. त्यावेळी बातम्यांमध्येही अनेक गोष्टी आल्या होत्या. वडील आणि त्यांच्या कुटुंबासोबत मला एक वेगळा कौटुंबीक सोहळा करायचा होता. माझ्या आईचे वडिलांच्या कुटुंबासोबतचे संबंध तुटल्यावर आईच्या घरी त्यांना बोलावणं मला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे मला जे बरोबर वाटलं ते त्यावेळी मी केलं. मी त्यांचा द्वेष करतो असं नाही. माझी आई आणि तिच्या इच्छांचा सन्मान करणं माझ्यासाठी महत्वाचं होतं.” Pratik Babbar |
पुढे त्याने सांगितले की, “माझे वडील आणि त्यांची पत्नी नादिरा बब्बर लग्नाच्या वेळी तिथे नव्हते, ते घरी येऊ शकले नाहीत याचं मला वाईट वाटलं. हे घर माझ्या आईने खरेदी केलं होतं. सिंगल मदर म्हणून तिला या घरात मला मोठं करायचं होतं. मी माफी मागतो, पण हा निर्णय मी आणि माझ्या पत्नीने मिळून घेतला होता.” यावेळी प्रतीकने हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक मतभेदामुळे घेतला नसल्याचेही स्पष्ट केले. मात्र या निर्णयामुळे बब्बर कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती. Pratik Babbar |
हेही वाचा:
Virat Kohli Retirement : रोहितनंतर विराट कोहलीचीही कसोटीतून निवृत्तीची घोषणा; भावनिक पोस्ट केली शेअर





