मुंबईतील ‘या’ मतदारसंघासाठी ‘राज बब्बर आणि स्वरा भास्कर’ यांच्या नावाची चर्चा; काँग्रेसच्या तिकिटावर लढणार निवडणूक?

Raj Babbar | Swara Bhaskar | Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. दरम्यान, काँग्रेसही उमेदवारांच्या नावावर विचारमंथन करत आहे. पक्षाने आतापर्यंत तीन उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. Raj Babbar | Swara Bhaskar | Lok Sabha Election 2024
पक्षाने अरुणाचल प्रदेशातील 2, गुजरातमधील 11, कर्नाटकातील 17, महाराष्ट्रातील 7, राजस्थानमधील 6, तेलंगणातील 5, बंगालमधील 8 आणि पुद्दुचेरीमधील 1 जागांवर उमेदवारांना तिकीट दिले आहे. तर आता उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या नावाची चर्चा अधिक होताना दिसत आहे.
उत्तर मध्य मुंबई हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळते याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अशातच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची स्वरा भास्करने दिल्लीत भेट घेतली होती. तर मुंबईतील या महत्त्वाच्या मतदारसंघासाठी स्वरा भास्करचं नाव आघाडीवर असल्याने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. Raj Babbar | Swara Bhaskar | Lok Sabha Election 2024
अभिनेता अभिषेक बच्चन सुद्धा निवडणुकीच्या मैदानात –
हिंदी चित्रपटातील प्रख्यात अभिनेता अभिषेक बच्चन सुध्दा या निवडणुकीतून राजकारणात डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. यासाठी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव अभिषेक यांना मध्य प्रदेशातील खजुराहो येथून उमेदवारी देउ शकतात.
समाजवादी पक्ष, स्वत: अखिलेश यादव अथवा बच्चन कुटुंबापैकी कोणाकडूनही या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र अभिषेक यांच्या नावावर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे –
गेल्यावेळेप्रमाणे यंदाही देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे, तर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जूनला मतदान होणार आहे. लोकसभेच्या 543 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल 4 जून रोजी लागणार आहेत.





