विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा होणार सक्रिय; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra Rain Update | मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने काहीसा दिलासा घेतला आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज 28 ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. गणपती आगमनानंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी करून जोरदार पावसाच्या सरींची तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाडा, कोकण आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. Maharashtra Rain Update |
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जारी
ऑरेंज अलर्ट : पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.
येलो अलर्ट : नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
येलो अलर्ट : अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, बुलढाणा, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर.
याशिवाय छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, गोवा, महाराष्ट्र, ओडिसा भागात जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. यासोबतच आसाम, मेघालय, राजस्थान, गुजरात, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू या भागात पाऊस होईल. पुढील काही दिवस देशातील विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Maharashtra Rain Update |
हेही वाचा :





