मुंबईत पावसाची विश्रांती! अनेक भागातील वाहतूक सेवा सुरळीत सुरू; नागरिकांना दिलासा

Mumbai Rain Update | मुंबईसह राज्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आज ओसरला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले होते. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल झाले. मात्र मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात पावसाने उसंत घेतली असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील अनेक भागात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक सेवा बंद होती. मात्र आता पाणी ओसरल्याने वाहतूक सेवा सुरळीत सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीला यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये आज मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. Mumbai Rain Update |
तर पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कमी होण्याची अपेक्षा आहे. Mumbai Rain Update |
हेही वाचा :





