तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये पावसाचा प्रकोप; ३३ जणांचा मृत्यू

Telangana and Andhra Pradesh | देशातील विविध भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झाला आहे.
तेलंगणात आतापर्यंत 16 आणि आंध्र प्रदेशात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मंगळवारी पावसाने दिलासा दिला. अशा परिस्थितीत राज्य सरकारांनी बाधित भागात मदतकार्य सुरू केलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये नौदलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. NDRFने गेल्या 24 तासात आंध्रमध्ये 5000 आणि तेलंगणात 2000 लोकांना वाचवले आहे.
सततचा पाऊस आणि पुरामुळे अनेक रस्ते वाहून गेले. त्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठीही लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने बाधित भागातील लोकांपर्यंत ड्रोनद्वारे मदत साहित्य पोहोचवले जात आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आपापल्या भागातील पूरग्रस्त भागांना भेट दिली.
पूरग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर सीएम रेड्डी यांनी महबुबाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आणि राज्यभरातील अधिकाऱ्यांना रिपोर्ट तयार करण्यास सांगितले. Telangana and Andhra Pradesh |
५ लाख रुपयांची आर्थिक मदत
तेलंगणा सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. सीएम रेड्डी यांनी पीएम मोदींना पूरग्रस्त भागांना भेटी देऊन राज्यातील नुकसान भरपाईसाठी ५००० कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आवाहन केलं आहे. यापैकी २००० कोटी रुपयांच्या तात्काळ आर्थिक मदतीचीही मागणी करण्यात आली आहे.
गुजरातमध्येही अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस
गुजरातमध्येही मंगळवारी अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने या आठवड्यात गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर हिमाचल प्रदेशात झालेल्या पावसामुळेही अनेक रस्ते बंद झाले आहेत. हिमाचल प्रदेशच्या बलदवारा राज्यात सर्वात जास्त पाऊस झाला, ज्याची नोंद 90 मिमी इतकी झाली. Telangana and Andhra Pradesh |
हेही वाचा:
‘बुलडोझर चालवायला पण डोकं लागतं’ ; योगी आदित्यनाथ यांचे अखिलेश यादव यांना सडेतोड उत्तर





