Railway Reservation: रेल्वेच्या तत्काळ तिकीट आरक्षणासाठी OTP बंधनकारक

Railway Reservation: येत्या 15 जुलैपासून रेल्वेचे तत्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना आधार संलग्न ओटीपी नोंदवणे बंधनकारक असणार आहे. आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाइटवरुन तत्काळ तिकीट आरक्षित करताना प्रवाशांचा आधार संलग्न ओटीपीची नोंद करणे आवश्यक असेल.
रेल्वेने यासंदर्भातलं पत्रक प्रसिद्ध केलं. याशिवाय ज्या खात्यावरुन तत्काळ तिकीट आरक्षित केले जाणार आहे ते खाते देखील आधार संलग्न असणे आवश्यक असेल. याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे.
तिकीट खिडकी किंवा रेल्वेच्या अधिकृत एजंटकडून तत्काळ तिकीट आरक्षित करताना तिकीट काढण्यासाठी दिलेल्या मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपीची पडताळणी 15 जुलैपासून आवश्यक असेल.
तत्काळ तिकीटांचे आरक्षण सुरू झाल्यावर पहिल्या अर्धा तासात रेल्वे एजंटांना तत्काळ तिकीट आरक्षित करता येणार नाही, असा निर्णयही रेल्वे मंत्रालयानं आज जाहीर केला.





