OTP सांगताच अडीच लाखांना गंडा, बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून महिलेची फसवणूक
Updated On:

पिंपरी – आयसीआसीआय बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून मोबाइलवर आलेला ओटीपी घेत 2 लाख 36 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शबनम मोहम्मद सय्यद (वय 37, रा. नेहरूनगर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांना 19 फेब्रुवारी 2022 रोजी अज्ञात महिलेने फोन केला. त्यांनी आयसीआसीआय बॅंकेतून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या क्रेडीट कार्डचे शेवटचे अंक सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवून हा नंबर शेअर करण्यास सांगितला. फिर्यादी महिलेने नंबर शेअर करताच त्यांच्या बॅंक खात्यातून 2 लाख 36 हजार 840 रुपये ेकाढून घेण्यात आले.





