Railway reservation ticket: रेल्वेच्या आरक्षण काउंटरवर तात्काळ रेल्वे तिकिटासाठी आता प्रवाशांना OTP बंधनकारक
Updated On:

नवी दिल्ली – रेल्वेच्या आरक्षण काउंटरवर तात्काळ रेल्वे तिकिटासाठी आता प्रवाशांना ओटीपी बंधनकारक करण्यात आला असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. तिकीट खरेदी करताना प्रवाशांना त्यांच्या मोबाईल नंबरवर येणारा ओटीपी सादर केल्यानंतरच तिकिटाचे प्रत्यक्ष वितरण होईल असे स्पष्ट करण्यात आले.
घाईगडबडीत अखेरच्या क्षणी तिकीट खरेदी करताना होत असलेले गैरव्यवहार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे रेल्वे विभागाने म्हटले आहे. यासंदर्भात रेल्वे प्रवाशांनी आणि इतरांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर अनेक तक्रारी रेल्वे विभागाकडे केल्यानंतर ही त्रुटी दूर करण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे आपल्या सेवांमध्ये निरंतर सुधारणा करण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय आगामी काळातही घेणार आहे.





