Priyanka Chopra Golden Temple Visit : देसी गर्लच्या साधेपणाचे कौतुक; सुवर्ण मंदिरात दर्शन घेतलं अन् भांडी घासली…
Priyanka Chopra Golden Temple Visit - व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत प्रियांका सुवर्ण मंदिरात नतमस्तक झाली. यावेळी तिने पंजाबी ड्रेस परिधान केला होता. डोक्यावर ओढणी घेत श्री गुरू ग्रंथ साहिब यांच्या चरणी प्रियांका नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं.

Priyanka Chopra Golden Temple Visit : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तिच्या मनात हिंदू धर्माबद्दल आस्था आणि तिचा साधेपणा स्पष्टपणे पाहायला मिळाला.
प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी भारतात दाखल झाली आहे. ऑस्कर सोहळ्यातील ग्लॅमरस उपस्थितीनंतर प्रियांकाने थेट अमृतसर गाठले. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात प्रियांकाने कडेकोट सुरक्षेत दर्शन घेतले. Priyanka Chopra Golden Temple Visit
यावेळी प्रियांकाच्या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत प्रियांका सुवर्ण मंदिरात नतमस्तक झाली. यावेळी तिने पंजाबी ड्रेस परिधान केला होता. डोक्यावर ओढणी घेत श्री गुरू ग्रंथ साहिब यांच्या चरणी प्रियांका नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं.
Actress Priyanka Chopra doing sewa at Sri Darbar Sahib (Golden Temple) Amritsar, Punjab. @priyankachopra pic.twitter.com/EftRV2MRNe
— Akashdeep Thind (@thind_akashdeep) March 31, 2026
इतकेच काय तर, तिने सुवर्ण मंदिरात सेवाही केली. आशीर्वाद घेतल्यानंतर प्रियांकाने लंगर हॉलमध्ये काही वेळ भांडी घासली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Priyanka Chopra Golden Temple Visit
दरम्यान, हॉलिवूड सिंगर निक जोनससोबत लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली असली तरीही प्रियांकाचा देसीपणा कमी झालेला नाही. अजूनही प्रियांका तिचे संस्कार विसरलेली नाही. सध्या तिच्या या कृतीचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. Priyanka Chopra Golden Temple Visit
प्रियांकाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, एसएस राजामौलींच्या वाराणसी सिनेमात ती दिसणार आहे. प्रियांकासोबत महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. ७ एप्रिल २०२७ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
Brain Health: दररोजच्या ‘या’ छोट्या चुका तुमचा मेंदू कमकुवत करतायत! वेळीच सावध व्हा





