Baramati and Rahuri by-election results : राहुरी-बारामती पोटनिवडणुकीचा निकाल आज; थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरूवात
Baramati and Rahuri by-election results : भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचे पारडे जड मानले जात असले, तरी अंतिम निकाल दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे, बारामती पोटनिवडणुकीची मतमोजणी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होत आहे.

Baramati and Rahuri by-election results : राज्यातील राहुरी आणि बारामती या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांची मतमोजणी आज सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. या दोन्ही ठिकाणच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी प्रशासनाने काटेकोर नियोजन करत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. या निकालामुळे स्थानिक राजकारणाची आगामी दिशा स्पष्ट होणार आहे.
राहुरी मतदारसंघात ५६ टक्के मतदान झाले असून, एकूण १ लाख ८७ हजार ४६३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. येथील मतमोजणी शहरातील धुमाळ महाविद्यालयात २० टेबलांवर २७ फेऱ्यांमध्ये होणार आहे.
भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचे पारडे जड मानले जात असले, तरी अंतिम निकाल दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे, बारामती पोटनिवडणुकीची मतमोजणी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होत आहे.
येथे ५८.२७ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असून, त्या अजित पवार यांचं लीड मोडणार का याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.
…तर अजित पवारांचा विक्रम मोडला जाणार
या पोटनिवडणुकीत एकूण २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. येथे ५८ टक्के मतदान झाले. आता या एकूण मतदानापैकी किमान १ लाख २३ हजार २६५ मतं जर सुनेत्रा पवार यांना मिळाली, तर अजित पवारांचा विक्रम मोडीत निघेल.





