Rahul Narwekar : “प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये आणि थोडी अस्पष्ट”; टिकेनंतर राहुल नार्वेकरांकडून दिलगिरी व्यक्त
Rahul Narwekar

Rahul Narwekar : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा शोक प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. हा शोक प्रस्ताव वाचताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून मराठी शब्दांचे उच्चार करताना चुका झाल्याने त्यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली.
मराठीत लिहिलेला हा अधिकृत शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्षांना व्यवस्थित वाचता आला नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मराठी भाषेचा आणि सभागृहाच्या परंपरेचा हा अवमान असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि रोहिणी खडसे यांनी देखील पोस्ट लिहून राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेत दिलगिरी व्यक्त केली. तसेच असे का घडले? याचे कारणही स्पष्ट केले.
‘त्या दिवशी 12 शोक प्रस्ताव होते आणि…’ (Rahul Narwekar)
हा वाद वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात आपली बाजू मांडत दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “त्या दिवशी 12 शोक प्रस्ताव होते आणि त्याचे वाचन मी सभागृहात केले. ते प्रिंट जी माझ्या हातात आलेली ती प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये होती आणि थोडी अस्पष्ट होती.
त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या ज्या सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या. वाचन करत असताना तसंच्या तसं ते वाचन झालं, ही एक चूक त्या दिवशी वाचन करत असताना माझ्याकडून घडली,” असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
….तेवढाच अभिमान मला मराठी भाषेबद्दल (Rahul Narwekar)
पुढे राहुल नार्वेकर म्हणाले की, गेली चार-साडेचार वर्षे मी या सभागृहात अध्यक्ष म्हणून काम करत आहे. ते काम करत असताना मी अनेक भाषणं मराठीत केली आहेत, अनेक शोक प्रस्ताव मराठीत मांडलेले आहेत.
या सभागृहाचा संपूर्ण प्रोसिडिंग नियम असतील अथवा सभागृहाची कार्यपद्धती असेल ही संपूर्ण आपण मराठी भाषेतूनच हाताळली आहे. जेवढा अभिमान मराठी भाषेबद्दल या सभागृहातील प्रत्येक सदस्याला आहे आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आहे त्याच्यापेक्षा अधिक किंवा तेवढाच अभिमान मला मराठी भाषेबद्दल आहे.” Rahul Narwekar
तसेच नार्वेकर यांनी, स्वर्गीय आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही या राज्यातील कोणतीही व्यक्ती करू शकत नाही आणि निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष तर मुळीच असं वक्तव्य करू शकत नाही, असेही सांगितले.
जे घडलं ते एका चुकीमुळे घडलेलं आहे, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये अशी मी विनंती करतो आणि तरीही त्या भाषणाच्या वाचन वेळेला राज्यातील किंवा सभागृहातील कुठच्याही व्यक्तीचे, सदस्याचे इकडे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो,: असे म्हणत नार्वेकर यांनी संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिले. Rahul Narwekar
हेही वाचा:






