Sanjay Raut : “राहुलजी संसदेच्या दारावर उभे आहेत, चोरून बघू नका…”; संजय राऊतांचा मोदी-शाहांवर निशाणा
Sanjay Raut : "आओ ना.. डरो मत..."

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीत जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी केलेल्या अत्याचारानंतर विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा पप्रयत्न करण्यात आला.
विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर अधिवेशनादरम्यान मोदी आणि अमित शाह संसदेत आले नाही. या मुद्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत एक्सवर पोस्ट करत लिहिले की, “आओ ना.. डरो मत.. तुम्ही 56 इंचवाले आहात माहित आहे. एक वेळा संसदेत येऊन तरी बघा. डरो मत, राहुल गांधी चांगले संस्कारी आहेत, ते तुम्हाला काहीच होऊ देणार नाहीत, फक्त संसदेत थोडी धुलाई करतील. इतका हक्क नक्कीच आहे. राहुलजी संसदेच्या दारावर उभे आहेत, चोरून बघू नका, आओ भाई..आईए…”
आओ ना..
डरो मत..
आप ५६ इंच वाले हो,मालूम है,
एक बार अंदर आकर तो देखो
डरो मत
राहुल गांधी अच्छे संस्कारी इन्सान है,
वो आपको कुछ नही करेंगे
बस सदन में थोडी धुलाई करेंगे
इतना तो हक बनताही है
राहुल संसद के दरवाजे पे खडे है..
छुपके मत देखो …
आओ भाई..आईए
@AmitShah pic.twitter.com/KVEhHTsYL6— Sanjay Raut (@rautsanjay61) August 10, 2026
‘अमित शाह जवाब दो’
आज संसद परिसरात विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात आंदोलन केले. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांच्यासह इतर विरोधी खासदारांनी ‘अमित शाह जवाब दो’ असे लिहिलेले फलक हातात घेत, शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. २० जुलै रोजी विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन द्यावे, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. Sanjay Raut
हेही वाचा:
Renuka Chaudhary: संसदेत रेणुका चौधरी यांच्या ‘खास चष्म्या’ची चर्चा ; सरकारवर साधला जोरदार निशाणा





