Renuka Chaudhary: संसदेत रेणुका चौधरी यांच्या ‘खास चष्म्या’ची चर्चा ; सरकारवर साधला जोरदार निशाणा
Renuka Chaudhary: काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी आज एका खास स्टाईलने संसदेत दाखल झाल्या.

Renuka Chaudhary: काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी आज एका खास स्टाईलने संसदेत दाखल झाल्या. त्यांच्या या स्टाईलची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. रेणुका चौधरी यांनी आज संसदेत खास चष्म्या लावून सरकारवर जोरदार निशाणा साधला.
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी आज एका अनोख्या पद्धतीने संसदेत दाखल झाल्या. त्यांनी जो चष्मा लावला होता, ज्याचा वापर करून त्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
खरं तर, रेणुका चौधरी सोमवारी एका अनोख्या पद्धतीने संसदेत दाखल झाल्या होत्या. त्यांच्या अनोख्या चष्म्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सरकारला काहीच दिसत नाही हे दाखवून देत त्यांनी सरकारवर टोला लगावला. Renuka Chaudhary:
रेणुका चौधरी यांनी या अनोख्या पद्धतीने सरकारविरोधात आपला निषेध व्यक्त केला. त्यांची ही पद्धत संसदेत चर्चेचा विषय बनली.
#WATCH | Delhi: Congress MP Renuka Chowdhury says, “These are glasses for the treatment of those ‘andhbhakts’… They don’t see the theft issue; they don’t see the bridge collapsing; they don’t see the NEET exam issue; they only offer praise. So, I thought we should arrange for… pic.twitter.com/HkxXnjpDWC
— ANI (@ANI) August 10, 2026
आपल्या चष्म्याबद्दल विचारले असता, रेणुका चौधरी म्हणाल्या की, त्यांनी तो स्वतः चिकटवलेला नाही. त्यांनी मिश्किलपणे म्हटले की, लोक रस्त्यावर मोफत वाटत होते, म्हणून त्यांनीही तो घातला.
रेणुका चौधरी यांनी सरकारवर पुढे निशाणा साधत म्हटले की, देशात देणग्यांची चोरी होत आहे की काय, हे ज्यांना दिसत नाही, त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत. सर्व काही उघडकीस येऊनही जे आंधळे राहतात, त्यांच्यासाठी हे आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या. Renuka Chaudhary:





